बंधुताचार्य, मा. प्रकाश रोकडे

९८२२८६७९०५, ९०११०६९२५५, ७७६८०३१११

prakashmrokade@gmail.com

माणसा माणसा जागा हो, बंधुत्वाचा धागा हो !



कार्यारंभ :


वयाच्या १८ व्या वर्षांपासून विविध सामाजिक संस्थांच्या माध्यामातुन कार्यरत.

१९८९ साली ’सम्यक सहकार आंदोलन’ या संस्थेच्या माध्यमातुन ’ सिम्बॉयसीस’ संस्थेच्या सहकार्याने मावळ तालुक्यातील दुर्गम भागामध्ये २५ महिलांच्या योगदानातुन साक्षरता अभियान राबवून केवळ ८ महिन्याच्या कालावधीमध्ये ११४ जणांना साक्षर करुन प्रत्यक्ष कार्यारंभ.

यानंतर इतर साहित्याबरोबरच ’ भारतीय संविधान’ वाचनात आले. त्यातील उद्देशिकेचा मनावर खोलवर परिणाम झाला. त्यामुळे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मुल्यांच्या संवर्धानासाठी कटिबद्ध. त्यासाठी ’बंधुता प्रतिष्ठान’ या संस्थेची स्थापना करुन कार्यास अधिका गतिमानता आणि व्यापकता.